शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे लंडनमधील घर दुरुस्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:17 IST

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घटनेचे शिल्पकार व कोट्यवधी दलित जनतेचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले लंडनस्थित घर राज्य शासनाने खरेदी केले असून, या घराच्या दुरुस्तीसाठी शासनाने ३ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यासंबंधीचा आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढला आहे.लंडन स्कूल आॅफ ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घटनेचे शिल्पकार व कोट्यवधी दलित जनतेचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले लंडनस्थित घर राज्य शासनाने खरेदी केले असून, या घराच्या दुरुस्तीसाठी शासनाने ३ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यासंबंधीचा आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढला आहे.लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत असताना डॉ. आंबेडकर हे १९२१-२२ मध्ये लंडनमधील १० किंग्ज हेन्री रोड एन. डब्लू-३ या घरात राहात होते. हे घर राज्य शासनाने खरेदी करून तिथे त्यांचे स्मारक करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार शासनाने हे घर खरेदी केले आहे. या घराची दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये झोन असोसिएटस लिमिटेड या कंपनीची सर्वांत कमी दराची निविदा असल्याने तीच अंतिम करण्यात आली आहे. या घराच्या नूतनीकरणासाठी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयास ३ कोटी ५५ लाख ५६५ इतकी रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार होती. तसे भारतीय उच्चायुक्तांकडूनही कळविण्यात आले होते. मूळ या सगळ््या कामासाठी ७ कोटी ४७ लाख ८२ हजार १५७ रुपयांचा निधी आवश्यक आहे. परंतु बदलता चलन दर विचारात घेऊन व जुलै २०१७ च्या पावसाळी अधिवेशनात या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या नियमानुसार त्यातील ७० टक्के रक्कम म्हणजे ३ कोटी १५ लाख निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.